राज्यात पेट्रोल तीन रुपयांनी महाग

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्री पेट्रोलवरील मूल्यवर्धित कराच्या दरात वाढ जाहीर केली. मात्र, डिझेलवरील करात कोणताही बदल केला नाही. याआधी सरकारकडून पेट्रोलवर प्रति लिटर 6 रुपयांचा मूल्यवर्धित कर आकारला जात असे. आता ही रक्कम 9 रुपये प्रति लिटर केली आहे.

मुंबई: महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर वाढविला असून, आता राज्यात पेट्रोल महागणार आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना यापुढे पेट्रोलसाठी लिटरमागे अतिरिक्त तीन रुपये मोजावे लागतील.

राज्यात सध्या पेट्रोलचा भाव सुमारे 77.45 रुपये प्रति लिटर आहे. या निर्णयामुळे राज्याचा महसूल वाढीस लागेल परंतु सर्वसामान्यांचा खिशाला झळ बसणार आहे. 

महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्री पेट्रोलवरील मूल्यवर्धित कराच्या दरात वाढ जाहीर केली. मात्र, डिझेलवरील करात कोणताही बदल केला नाही. याआधी सरकारकडून पेट्रोलवर प्रति लिटर 6 रुपयांचा मूल्यवर्धित कर आकारला जात असे. आता ही रक्कम 9 रुपये प्रति लिटर केली आहे.

नव्या धोरणानुसार, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागात पेट्रोलवर 26 टक्के अधिक 9 रुपयेएवढा मूल्यवर्धित कर वसूल केला जाईल तर राज्यातील उर्वरित भागात पेट्रोलसाठी 25 टक्के अधिक 9 रुपये प्रति लिटर कर आकारण्यात येणार आहे. नऊ रुपयांची रक्कम शेतकरी कल्याण निधी म्हणून वापरली जाणार आहे.