येतोय इन्फोसिसचा बायबॅक!

येतोय इन्फोसिसचा बायबॅक!

सलग आठ सेशनच्या घसरणीनंतर बाजार गुरुवारी वधारला. शुक्रवारी तोच कल कायम राहिला आणि बाजार पुनः जोमानं उसळला. निमित्त? मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेनं भारताचं पतमापन उंचावलं! एकदम बाजाराचा मंदीचा मूड कुठल्या कुठं गायब झाला आणि तेजी अवतरली. बाजारानं बॅंकांमध्ये याची उत्तर दिशा शोधली आणि सरसकट सर्वच बॅंकांचे समभाग उत्तरेस झेपावले. एकूण व्यवहाराच्या आकडेवारीत स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक व येस बॅंक अनुक्रमे ९०३ कोटी ६७० व ५७१ कोटी असे आघाडीवर राहिले. बॅंक ऑफ बडोदा व पंजाब नॅशनल बॅंक हे निफ्टीबाहेरील शेअर्सही ५७८ व ५५० कोटी असे सर्वोच्च व्यवहार दाखवत होते.

आठवडा अखेरीस सेन्सेक्‍स व निफ्टी यांनी आपल्या ३२,२०० व १०,२०० या भावनिक पातळ्यावर निर्देशांक राखण्यात यश मिळवले. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ३३,३४३ व १०२८३ वर सर्वसाधारण १.२५ टक्केवर बंद झाले. शुक्रवारची पातळी कायम राखत पुढे बाजार ३ दिवस चालला तर नवीन तेजीची चिन्हे दिसतील. अन्यथा बाजार साईड वेज चालेल.

बरेच महिने गाजत असलेला विप्रोचा बायबॅक, ३४ कोटी शेअर्स (बायबॅक मूल्य ३२० - सध्याचा बाजारभाव, २९४ रेकॉर्ड डेट १५ सप्टें. - बायबॅक मूल्य ११०० कोटी) दि. २९ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर चालणार आहे. पाठोपाठच इन्फोसिसचा बायबॅकही (सध्याचा भाव ९७०, बायबॅक दर ११५०, बायबॅक मूल्य १३,००० कोटी) दि. ३० नोव्हेंबरला सुरू होत आहे व १४ डिसेंबरपर्यंत आहे.
रेकॉर्ड डेट १ नोव्हेंबर होती. विप्रोचा प्रीमियम आजच्या तारखेला ९ टक्के पडतो तर इन्फो.चा १८ टक्के. 

लहान गुंतवणूकदारांना (२ लाख शेअर मूल्य) दोन्हीही बायबॅक ऑफर चांगल्या आहेत. अनुज्ञेय भागधारकांनी, अनुज्ञेय, तसेच वाढीव शेअर्सही बायबॅकसाठी द्यावेत. दीर्घ मुदतीसाठी ते ठेवायचे असल्यास कमी भावाने मिळत असल्यामुळे पुनः बाजारातून विकत घ्यावेत. पण अल्प मुदतीसाठी मिळणारा नफा पदरात पाडून घ्यावा.

सध्या आयपीओचे पीक कमी झाले आहे. गेल्या आठवड्यात सूचिबद्ध झालेल्या खादिम व न्यू इंडियाने गुंतवणूकदारांना चांगलाच दणका दिला. त्यामुळे आयपीओला अर्ज केले खरे; पण ॲलाटमेंट होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवायची वेळ आली होती. रोज रविवार नसतो हे बाजाराने दाखवून दिले.
एचडीफएसी स्टॅंडर्ड लाईफच्या बाबतीत मात्र तसे काही घडले नाही. तो ७ टक्के अधिमूल्याने खुला व चांगला १० टक्‍क्‍यांनी बंद झाला.

भारत २२ इटीएफला चांगली मागणी होती व त्याची ॲलॉटमेंट बहुधा निश्‍चित (कमी) होईल. दीर्घ मुदतीसाठी हा इटीएफ नक्कीच चांगला आहे. मात्र ज्यांची बस चुकली असेल आणि त्यांनी हा सूचिबद्ध झाल्यावर बाजारातून घ्यावा. माफक अधिमूल्यात तो मिळावा.

मुकेशला (मु.कॅश - मुबलक कॅश) व अनीलला (ए नील) या अंबानी बंधूंवरील, त्यांची नावे धीरूभाईंनी कशी योग्य ठेवली आहेत, असा एक व्हॉटस्‌ॲप मेसेज फिरत होता. (कारण गेल्या महिन्याभरात अनिल अंबानींच्या शेअर्सची धूळधाण उडाली आहे)

आयपीओवरील जसपाल भट्टींचा २० वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ यू ट्यूबवर पाहायला मिळाला. एकदम भन्नाट आहे. आज्या आयपीओच्या वारेमाप पिकाला तो लागू होतो. प्रत्येकाने जरूर पाहावा.

आता खालील शेअर्स पाहा आणि त्याचा स्वतःच्या पोर्टफोलिओत असण्याच्या दृष्टीने अभ्यास करा.
३ एम इंडिया रसोई, बॉश याच पठडीतले आहेत. चांगले शेअर स्वस्त असत नाहीत हे लक्षात ठेवा!

कंपनी     सध्या  दर रुपये     ५ वर्षांतील मोबदला टक्के
आयशर मोटर     ३०,६३७     १३०५ 
श्री सिमेंट     १८१९९     ६२७
एमआरएफ     ६९४७७     ५५२
पेज इंडस्ट्रीज     २३५३४     ६४०
हनीवेल ॲटो     १७२४९     ५५२
पोलसन     १२९५६     ५८२६
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com