‘मोबिक्विक’ व्यवसायवृद्धीसाठी रु.300 कोटी गुंतवणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: डिजिटल वॉलेट कंपनी मोबिक्विकने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सुमारे 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. हा निधी ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी तसेच व्यापाऱ्यांचे जाळे विस्तारण्यासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीचे उपाध्यक्ष दमन सोनी यांनी दिली.

या गुंतवणूकीसाठी कंपनीकडे सध्या काही प्रमाणात निधी उपलब्ध असून आणखी एका गुंतवणूक फेरीद्वारे निधी उभारण्याची कंपनीची योजना आहे. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत हा निधी उभारणार आहे. आतापर्यंत कंपनीने 85 दशलक्ष डॉलरचा निधी उभारला आहे.

मोबाईल वॉलेट 'पेटीएम'शी स्पर्धा करणाऱ्या 'मोबिक्विक'चा आपला ग्राहकवर्ग 55 दशलक्ष डॉलरवरुन 150 दशलक्ष डॉलरवर नेण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर कंपनी आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या 5 दशलक्ष डॉलरवरुन 1.4 दशलक्ष डॉलरवर नेऊ इच्छित आहे.

डिजिटल आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्राने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मोबिक्विक आणि पेटीएमसारख्या कंपन्यांना मोठा लाभ झाला आहे. अधिकाधिक लोकांनी मोबाईल वॉलेट्सचा वापर सुरु केल्याने या कंपन्यांच्या ग्राहकसंख्येत मोठी वाढ झाली. नोटाबंदीनंतर मोबिक्विकच्या ग्राहकांची संख्या 15 दशलक्ष डॉलरवर पोचली असून कंपनीसोबत काम करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या 1.3 दशलक्ष डॉलर झाली आहे.

अर्थविश्व

विविध स्तरातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीसह पुणे शहर रिअल इस्टेट क्षेत्रातील डेस्टिनेशन कसे ठरले यावर सध्याच्या ...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई - इन्फोसिसमधील नाट्यमय घडामोडी आणि जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्यांतर्गत ज्या व्यायसायिकांची व्यावसायिक उलाढाल २० लाखांच्या आत असूनही त्यांनी...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017