निफ्टी 10 हजारांवर; सेन्सेक्‍सची घोडदौड सुरूच

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

तेल आणि वायू, आयटी, एफएमसीजी आदी शेअर्समधील खरेदीने शेअर बाजारातील तेजी आणखी वृद्धींगत झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे.

मुंबई : शेअर बाजाराची घोडदौड सुरूच आहे. शेअर बाजारात आज (मंगळवार) राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने दहा हजारांची ऐतिहासिक पातळी गाठली आहे. इंट्राडे व्यवहारात 10,011.30 अंशांची उच्चांकी पातळी गाठली आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 32,374.30 आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली आहे.

तेल आणि वायू, आयटी, एफएमसीजी आदी शेअर्समधील खरेदीने शेअर बाजारातील तेजी आणखी वृद्धींगत झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेसंबधीच्या अहवालात चालू वर्षासाठीचा भारताचा विकासदर 7.2 टक्के कायम ठेवला आहे. 2018 मध्ये तो 7.7 टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल, असे म्हटले आहे. नाणेनिधीचा नवा अंदाज आणि निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांनी 7.5 टक्के विकासाबाबत केलेल्या सूचक वक्‍तव्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शेअर बाजारात विप्रो, इन्फोसिस, एसबीआय, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स, टीसीएस, आयटीसी यासारख्या महत्वाच्या बड्या शेअर्सच्या खरेदीला गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिले. ज्यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्‍स आणि निफ्टीने नवा उच्चांकाला स्थापित केला. दमदार तिमाही कामगिरी आणि बोनस शेअरमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये देखील खरेदीचा उत्साह आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने 1629 रुपयांचा वर्षभराचा उच्चांकी स्तर गाठला.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

अर्थविश्व

पणजी - ‘‘उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा खरेदीचा ओघ आणि जागतिक पोषक वातावरणाने सोमवारी निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला....

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - बॅंकिंग फ्रंटियर्सतर्फे सर्वोत्तम माहिती-तंत्रज्ञानप्रमुख म्हणून कॉसमॉस को-ऑप. बॅंकेच्या आरती ढोले यांना २०१६-१७ या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017