सेन्सेक्स तेजीत; निफ्टी 7950 पातळीच्या पार

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई: कालची भीती मागे टाकत आज(मंगळवार) भारतीय शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 100 अंशांनी वधारला असून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 7950 अंशांच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. फार्मा क्षेत्रातील तेजीचा निर्देशांकाच्या वाढीला हातभार लागत आहे. त्याचप्रमाणे, आयटी क्षेत्रातदेखील खरेदीचा जोर दिसून येत आहे.

सध्या(11 वाजून 15 मिनिटे) सेन्सेक्स 138.06 अंशांनी वधारुन 25,945.16 पातळीवर व्यवहार करत आहे. निर्देशांक 44.30 अंशांच्या वाढीसह 7,952.55 पातळीवर व्यवहार करत आहे.

निफ्टीवर अरबिंदो फार्मा, एचसीएल टेक, ल्युपिन, सिप्ला आणि टाटा मोटर्स(डीव्हीआर) चे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर आयडिया सेल्युलर, हिरो मोटोकॉर्प, ग्रासिम, इंडसइंड बँक आणि भारती एअरटेलचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: Nifty Regains 7,950 Level