नोकिया पुन्हा फायद्यात 

पीटीआय
बुधवार, 25 एप्रिल 2018

कोलकता - मोबाईल व्यवसायातील आघाडीचे स्थान गमावल्यानंतर नोकिया कंपनीची सुरू असलेली तोट्यातील वाटचाल संपली आहे. कंपनीने पुन्हा मोबाईल बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर ती फायद्यात आली आहे. 

याविषयी नोकियाचे जागतिक व्यापार प्रमुख अमित गोयल म्हणाले, की भारतात कंपनी नफ्यात आली आहे. मागील वर्षात कंपनीने जगभरात ७ कोटी मोबाईलची विक्री केली असून, यामध्ये फीचर मेनचा समावेश अधिक आहे. कंपनी फीचर फोनच्या बाजारपेठेवर अधिक भर देणार आहे. देशांतर्गत बाजारपेठेत फीचर फोनचा वाटा ५० टक्के आहे. नोकियाचे पाच फीचर फोन आणि आठ स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल झाले आहेत अथवा त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. 

नोकिया कंपनीने आज नोकिया ६, नोकिया ७ आणि नोकिया ८ सिरोक्को हे तीन मोबाईल सादर केले. यातील केवळ नोकिया ८ सिरोक्कोचे उत्पादन भारतात झालेले नाही. कंपनीने ऑनलाइन आणि ऑफलाइन ग्राहकांसाठी एकच किंमत ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले आहे, असे गोयल यांनी नमूद केले.

Web Title: Nokia again Profit