आता ‘ही’ आयटी कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार?

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

मुंबई: देशातील तिसऱ्या क्रमांकाची दिग्गज आयटी कंपनी असणार्‍या 'विप्रो' चालू वर्षात 10 टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. विप्रोमध्ये सध्या 1.8 लाख कर्मचारी कार्यरत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनुष्यबळ खात्याने (एचआर) प्रोजेक्ट बी-10 म्हणजेच 'बॉटम टेन' या नावाने मनुष्यबळ कपात करण्याची योजना हाती घेतली आहे. मात्र कंपनीच्या सूत्रांकडून याबाबत बोलण्यास नकार देण्यात आला आहे. मनुष्यबळ कपातीबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे कंपनीने ई-मेलला दिलेल्या प्रतिसादात म्हटले आहे.

"आम्ही दरवर्षी खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकतो आणि यावर्षीदेखील तीच पद्धत सुरु आहे", असे कंपनीने माध्यमांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.

गेल्या वर्षी कंपनीने तिमाही मूल्यमापन यंत्रणा सादर केली होती. त्याद्वारे गेल्या महिन्यात सहाशे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कामगिरी मूल्यांकनामध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी न बजावणार्‍या सहाशे कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

कंपनीमध्ये सध्या वार्षिक कामगिरीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असून अजूनही 1400 लोकांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. बेंगळुरूस्थित मुख्यालय असणार्‍या कंपनीमध्ये सध्या 1 लाख 79 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जात असते. त्यामुळे कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे काम न करणार्‍या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाते, असे विप्रोकडून सांगण्यात आले.

भारतीय आयटी क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण आहे. आयटी कंपन्यांच्या तिमाही नफ्यात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. "ऑटोमेशन" आणि अमेरिकी सरकारच्या "अमेरिका फर्स्ट' या नव्या धोरणामुळे भारतीय आयटी कंपन्यांपुढे संकट उभे राहीले आहे. चालू वर्षात कॉंग्निझंट या कंपनीने 13 हजार कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. टेक महिंद्राने देखील सुमारे दीड हजार ते दोन हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे

सध्या मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर 525.60 रुपयांवर व्यवहार करत असून 5 रुपयांची वाढ झाली आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 410 रुपयांची नीचांकी तर 577.50 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.127,728.95 कोटींचे बाजारभांडवल आहे.