न्यूपॉवर रिन्यूएबल्स रडारवर

पीटीआय
गुरुवार, 14 जून 2018

नवी दिल्ली - आयसीआयसीआय बॅंकेच्या प्रमुख चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीच्या न्यूपॉवर रिन्यूएबल्सची चौकशी कंपनी व्यवहार मंत्रालयाने सुरू केली आहे. व्हिडिओकॉन समूहाला कर्ज देताना चंदा कोचर यांनी कुटुंबीयांना लाभ मिळवून दिल्याचा आरोप झाल्यांनतर अनेक तपास यंत्रणांकडून कोचर कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. 

आयसीआयसीआय बॅंकेशी संबंधित न्यूपॉवर रिन्यूएबल्स आणि पाच कंपन्यांची कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पी. पी. चौधरी यांनी दिली. चौधरी म्हणाले की, न्यूपॉवर रिन्यूएबल्ससह पाच कंपन्यांच्या चौकशीचे २३ एप्रिलला आदेश दिले होते. त्यानुसार या कंपन्यांची चौकशी सुरू आहे. तपास प्रक्रियेत या कंपन्यांची लेखापुस्तके आणि कागदपत्रांची छाननी करण्यात येईल. आयसीआयसीआय बॅंकेकडून कर्ज मिळविण्यासाठी व्हिडिओकॉन समूहाकडून न्यूपॉवर रिन्यूएबल्समध्ये गुंतवणूक झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. 

आयसीआयसीआय बॅंकेने व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या ३ हजार २५० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी आयसीआयसीआय बॅंकेची अंतर्गत समिती, भांडवली बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’, रिझर्व्ह बॅंक, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) तसेच ‘अमेरिकन सिक्‍युरिटी अँड एक्‍सचेंज कमिशन’कडून तपास केला जात आहे. दरम्यान, ‘अमेरिकन सिक्‍युरिटी अँड एक्‍सचेंज कमिशन’कडून कोणतीही विचारणा झाली नसल्याचा खुलासा आयसीआयसीआय बॅंकेने केला आहे.

आयसीआयसीआय बॅंकेशी निगडित सहा कंपन्यांची चौकशी 
चंदा कोचर यांच्या हितसंबंधांची बॅंकेकडून तपासणी सुरू 
सीबीआय, सेबी, रिझर्व्ह बॅंकेकडूनही चौकशी 
‘अमेरिकन सिक्‍युरिटी अँड एक्‍सचेंज कमिशन’कडून तपासणी 

Web Title: NuPower Renewables Company inquiry