ओएनजीसी आता ‘एचपीसीएल’ ताब्यात घेणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई: ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात ओएनजीसी लवकरच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनवर ताबा मिळवण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर तिसर्‍या क्रमांकाचा तेल आयातक देश असलेल्या भारताची एक मोठी तेल कंपनी असणे आवश्यक आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर परदेशी मालमत्तांचे अधिग्रहण करणे सोपे होईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना म्हणाले.

जेटलींनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितल्याप्रमाणे, भारतातील सर्व सरकारी तेल कंपन्यांचे एकत्रीकरण होणे शक्य आहे. एकत्रीकरणानंतर ओएनजीसी देशातील सर्वात मोठी तेल कंपनी ठरणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सरकारची एचपीसीएलमध्ये असलेली 51.11 टक्के हिस्सेदारी ओएनजीसी स्थानांतरीत केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात ओएनजीसीचा शेअर 195.20 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात किरकोळ घसरण झाली आहे. पचे रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 125.40 रुपयांची नीचांकी तर 212 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.250,953.91 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: ONGC may take control of HPCL to create mega oilco: Report