'पेटीएम'चे एका दिवसात 50 लाख विक्रमी व्यवहार 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पुणे: देशातील सर्वांत मोठा मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या "पेटीएम'ने एका दिवसात विक्रमी पन्नास लाख व्यवहार केले आणि 24 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम "प्रोसेस' करण्याच्या मार्गावर आहे. 

पुणे: देशातील सर्वांत मोठा मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या "पेटीएम'ने एका दिवसात विक्रमी पन्नास लाख व्यवहार केले आणि 24 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम "प्रोसेस' करण्याच्या मार्गावर आहे. 

ऑनलाइन-टू-ऑफलाइन पेमेंट सुविधा सुरू केल्यानंतर वर्षभरात "पेटीएम' हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे क्‍यूआर कोड आधारित नेटवर्क बनले आहे. ग्राहक आणि व्यापाऱ्यांची मोठी पेमेंट प्रणाली पाठीशी असलेल्या या कंपनीने गेल्या काही दिवसांत एकंदर देवाणघेवाणीत 700 टक्के वृद्धी आणि पेटीएम खात्यात जमा झालेल्या रकमेत 1000 टक्के वाढ नोंदविली आहे. या कालावधीत, व्यवहाराचे मूल्य सरासरी तिकीट आकारमानाच्या 200 टक्के आणि ऍप डाउनलोड्‌सची संख्या 300 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 

प्रत्येक वापरकर्त्याद्वारे एका आठवड्यात करण्यात येणाऱ्या व्यवहारांची संख्यादेखील तीनपासून वाढून 18 च्या वर पोचली आहे, असे "पेटीएम'चे वरिष्ठ उपाध्यक्ष किरण वासिरेड्डी यांनी सांगितले आहे. 

देशभरातील असंख्य ऑफलाइन व्यापारी पेमेंटसाठी "पेटीएम' पसंत करीत आहेत. "पेटीएम' आता जवळजवळ सर्व ठिकाणी चालते. त्यात टॅक्‍सी, रिक्षा, पेट्रोल पंप, किराणा दुकाने, रेस्टॉरंट, कॉफी शॉप, मल्टिप्लेक्‍स, पार्किंग, फार्मसी, दवाखाने, वर्तमानपत्र विक्रेते आदींचा समावेश आहे. याशिवाय रिचार्ज, बिल पेमेंट, सिनेमाची तिकिटे, प्रवासाचे बुकिंग, जेवणाची ऑर्डर देणे, खरेदी या आणि अशा अनेक व्यवहारांसाठी हजारो ऍप आणि वेबसाइट्‌सवर "पेटीएम'द्वारे पेमेंट करता येते, असे त्यांनी नमूद केले. 

 
 

टॅग्स