सेबीच्या आदेशानंतर रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

मुंबई: 'सेबी'ने "इनसायडर ट्रेडिंग'प्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर बाजारातील वायदे व्यवहारांवर बंदी घातल्यानंतर आज(सोमवार) कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 2 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. याप्रकरणी रिलायन्ससोबत अन्य बारा कंपन्यांवर शेअर बाजारातील वायदे व्यवहार करण्यावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. परंतु, रिलायन्सने या निर्णयाला आव्हान देण्याची घोषणा केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजला 447 कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे. यावर 29 नोव्हेंबर 2007 पासून 12 टक्के व्याज भरावे लागणार असून, हा दंड व व्याज 45 दिवसांच्या आतमध्ये भरावे लागणार आहे. "इनसायडर ट्रेडिंग'प्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजविरोधात सुमारे दहा वर्षे खटला सुरू होता. कंपनीने "इनसायडर ट्रेडिंग'मधून 513 कोटी रुपये कमाविल्याचे "सेबी'ने म्हटले आहे. "सेबी'ने रिलायन्स पेट्रोलियम "इनसायडर ट्रेडिंग'प्रकरणी 13 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

मुंबई शेअर बाजारात आज(सोमवार) रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1267.55 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 1256.10 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 1278.50 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(11 वाजून 37 मिनिटे) कंपनीचा शेअर 1260.55 रुपयांवर व्यवहार करत असून 25.65 रुपये अर्थात 1.99 टक्क्यांनी घसरला आहे.