इन्फोसिस 14 जुलै रोजी रोजी सादर करणार तिमाही निकाल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

मुंबई: आयटी क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची कंपनी असणारी इन्फोसिस येत्या 14 जुलै रोजी जून अखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.

इन्फोसिस दरवर्षी एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तिमाही निकाल जाहीर करत असते. "ऑडिट, लाभांश आणि तिमाही निकालासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 13 आणि 14 जुलै, 2017 रोजी होणार आहे" असे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला सादर केलेल्या अहवालात म्हटले होते.

सरलेल्या तिमाहीत इन्फोसिसने 3,603 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता. त्यामध्ये 2.8 टक्क्यांची घसरण झाली होती. शिवाय सरलेल्या तिमाहीत कंपनीला 17,120 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मार्च तिमाहीमध्ये इन्फोसिसने आपल्या भागधारकांना गेल्या आर्थिक वर्षासाठी प्रतिशेअर 14.75 रुपयांचा लाभांश जाहीर केला होता.

आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर 4 रुपयांच्या घसरणीसह 943 रुपयांवर व्यवहार करतो आहे.