रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

मुंबई - रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज (मंगळवार) जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. 

आता रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के करण्यात आला आहे. पहिल्यांदाच रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीकडून पहिले पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. याआधी दरकपात करण्याचा अधिकार फक्त रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरकडे होता. आरबीआयचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी प्रथमच पतधोरण जाहीर केले आहे. गेल्या द्विमाही पतधोरण आढाव्यात आरबीआयने व्याजदर "जैसे थे‘ ठेवले होते.

घाऊक तसेच किरकोळ महागाईचे दर नियंत्रणात असल्याने आणि महागाई दर आरबीआयने निर्धारित केलेल्या समाधान पातळीवर आहेत. शिवाय सरकारने वित्तीय तुटीला आवर घातल्याचे दिसून येत असल्याने आरबीआयने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केल्याचे बोलले जात आहे. आता आरबीआयने दरकपात केल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थात कर्जाप्रमाणेच ठेवींवरील व्याजदरदेखील कपातीच्या शक्यतेने मात्र व्याजावर अवलंबून असलेल्या नागरिकांना झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे.