पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नोटादेखील वैध राहतील. नव्या नोटांची रचनादेखील प्रचलित नोटांसारखीच आहे

मुंबई: रिझर्व्ह बँक (आरबीआय) लवकरच पाचशे रुपयांची नवी नोट छापणार आहे.

आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी असणाऱ्या नव्या नोटेवर 'A' हे इनसेट अक्षर असेल, असे वृत्त आहे. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नोटादेखील वैध राहतील. नव्या नोटांची रचनादेखील प्रचलित नोटांसारखीच आहे, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी 16 डिसेंबरला महात्मा गांधी (न्यू) श्रेणीत पाचशेच्या नव्या नोटा छापण्याची घोषणा करण्यात आली होती. या नोटेच्या दोन्ही नंबर पॅनलवर 'E' अक्षर आणि मागील बाजूस स्वच्छ भारतचा लोगो छापण्यात आला होता. काही नोटांवर उपसर्ग आणि आकड्याच्या मध्ये * चिन्ह छापण्याविषयी सांगण्यात आले होते.