जुन्या नोटा जमा करण्यासाठी नागरिकांची धावपळ

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई : जुन्या पाचशे आणि हजारांच्या  नोटा बदलून घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक असल्याने बुधवारी नागिरकांनी रिझर्व्ह बॅंकेच्या मुंबईतील मुख्यालयाबाहेर एकच गर्दी केली होती. जुन्या नोटा जमा करण्यासाठीमहाराष्ट्रासह गुजरात आणि इतर राज्यातून आलेल्या हजारो नागरकांना तळपत्या उन्हात चार ते पाच तास ताटकळावे लागले.

मुंबई : जुन्या पाचशे आणि हजारांच्या  नोटा बदलून घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक असल्याने बुधवारी नागिरकांनी रिझर्व्ह बॅंकेच्या मुंबईतील मुख्यालयाबाहेर एकच गर्दी केली होती. जुन्या नोटा जमा करण्यासाठीमहाराष्ट्रासह गुजरात आणि इतर राज्यातून आलेल्या हजारो नागरकांना तळपत्या उन्हात चार ते पाच तास ताटकळावे लागले.
नोटाबंदीच्या काळात परदेशी गेलेल्या भारतीयांना आवश्यक कागदपत्रासहित रिझर्व्ह बॅंकेत 31 मार्चपर्यंत जुन्या नोटा जमा करता येणार आहेत. मात्र याबाबत सोशल मीडियावर चुकीचा मेसेज व्हायरल झाल्यावर सर्वसामान्यांनी देखील आरबीआय कार्यालया बाहेर गर्दी केली. बुधवारी नागरिकांची मोठी रंग लागली होती. नाशिक , नागपूर, औरंगाबाद, कोहापूर तसेच अहमदाबाद , सुरत येथून नागरिक जुन्या नोटा जमा  करण्यासाठी आले होते. नाशिकवरून आलेल्या जितेन चंदानी यांना अडीच हजार रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी तब्बल पाच तास रांगेत ताटकळावे लागले. अशीच अवस्था रत्नागिरीहून आलेल्या समीर खेर यांची झाली. खेर यांना पाच हजार रुपयांच्या जुन्या नाेटा बदलण्यासाठी सहा तास प्रतिक्षा करावी लागली. 
दरम्यान भारतीय पारपत्र असलेल्या अनिवासी भारतीयांना 30 जूनपर्यंत जुन्या नोटा बदलण्याची संधी आहे. जुन्या नोटासंदर्भातील अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन आरबीआयने केले आहे.

मुदतवाढीची शक्यता धूसर
केंद्राने 30 डिसेंबर रोजी जारी केलेल्या वटहुकूमात अनिवासी भारतीय वगळता इतरांना जुन्या नोटा बदलण्यासाठी 30 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. शिवाय नोटबंदीत परदेशी गेलेल्या भारतीयांसाठी ३१ मार्च अंतिम मुदत आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी न्यायालयात देखील याचिका करण्यात आली. मात्र यात हस्तक्षेप करण्यात न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे सरकारकडून देखील मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर झाल्याचे आरबीआय मधील सूत्रांनी सांगितले.

दंड भरावा लागणार
संसदेने मागील महिन्यात निर्दिष्ट बॅंक नोट कायदा मंजूर केला आहे. रद्द केलेल्या जुन्या नोटांच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था चालवली जाऊ नये, यासाठी  हा कायदा केला आहे. पाचशे किंवा हजाराच्या दहापेक्षा अधिक नोटा सापडल्यास त्या व्यक्तीला 50 हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

Web Title: RBI refuses to answer why exchange of old notes was not allowed till March 31