जिओ देईल 2,599 रुपयांचा कॅश बॅक

वृत्तसंस्था
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

कॅश बॅक व्यतिरिक्त रिलायन्स जिओ कडून इतर ऑफरही देण्यात आल्या आहेत. Reliancetrends.com या शॉपिंग वेबसाइटहून 1999 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांच्या खरेदीवर 500 रुपयांची तात्काळ सवलत मिळेल. तर Ajio.com वरुन 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकची खरेदी केल्यास 399 रुपयांची सवलत दिली जाईल. तसेच, जिओ ने यात्रा डॉट कॉम सोबत केलेल्या भागीदारी अंतर्गत, या ट्रॅवल वेबसाइटहून विमानाच्या एका तिकीटावर 500 रुपये आणि राउंड ट्रिपवर 1000 रुपयांची सूट दिली जाणार आहे. 

रिलायन्स जिओकडून नेहमीच ग्राहकांना नवीन ऑफर्स दिल्या जातात. यावेळी जिओ प्राईम मेंबरसाठी 2,599 रुपयांपर्यंत कॅश बॅक ऑफर घेउन आले आहे. 10 नोव्हेंबर पासून ऑफरला सुरुवात झाली आहे. 

जिओच्या प्रत्येक प्राईम मेंबरला विशेष ऑफर देण्यात आली आहे. 399 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रुपयांच्या रिचार्जवर 2,599 रुपयांपर्यंत कॅश बॅक मिळणार आहे. ही ऑफर 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2017 पर्यंत खुली राहणार आहे. मायजिओ वा जिओ डॉट कॉम वरुन 399 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रुपयांचा रिचार्ज केल्यास एकुण 400 रुपयांचा कॅश बॅक मिळेल. हा कॅश बॅक 50 रुपयांच्या आठ वाउचर स्वरुपात दिल्या जाईल. या वाउचर्सचा उपयोग रिचार्ज करतेवेळी रिचार्ज पॅकची किंमत 50 रुपयांनी कमी करण्यासाठी करता येऊ शकेल. 

2599 रुपयांच्या कॅश बॅक ऑफरमध्ये 400 रुपये जिओ अॅपच्या माध्यमातून दिले गेले आहेत. तर 300 रुपये मोबाईल वॉलेटद्वारे देण्यात आले आहेत. जिओचे भागीदार असलेले अॅमेझॉनपे, अॅक्सिसपे, फ्रीचार्ज, मोबिकविक, पेटीएम आणि फोनपे यांसारख्या वॉलेटमध्ये ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

कॅश बॅक व्यतिरिक्त रिलायन्स जिओ कडून इतर ऑफरही देण्यात आल्या आहेत. Reliancetrends.com या शॉपिंग वेबसाइटहून 1999 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांच्या खरेदीवर 500 रुपयांची तात्काळ सवलत मिळेल. तर Ajio.com वरुन 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकची खरेदी केल्यास 399 रुपयांची सवलत दिली जाईल. तसेच, जिओ ने यात्रा डॉट कॉम सोबत केलेल्या भागीदारी अंतर्गत, या ट्रॅवल वेबसाइटहून विमानाच्या एका तिकीटावर 500 रुपये आणि राउंड ट्रिपवर 1000 रुपयांची सूट दिली जाणार आहे. 

जिओ पार्टनरसह विविध मोबाईल वॉलेटवर जिओच्या 399 रुपयांवर मिळणार पुढील कॅशबॅक:
भागीदार      प्रथमच रिचार्ज करणार्‍यांसाठी       जिओच्या जुन्या ग्राहकांसाठी      

अॅमेझॉनपे-                     99                             20
पेटीएम-                       50 (code-NEWJIO)     15 (code-PAYTMJIO)           फोनपे-                        75                             30
मोबिकविक-                   300 (code-NEWJIO)    149 (code- Jio149)
ऍक्सिसपे-                     100                             35
फ्रीचार्ज-                       75  (code- JIO75)    50 (code- JIO50) 

ही एकाच महिन्यातील दुसरी कॅश बॅक ऑफर जिओने दिली आहे. यापूर्वी दिवालीत देखील जिओकडून ग्राहकांना कॅश बॅक ऑफर देण्यात आली होती.