जिओची “वेलकम ऑफर’ तीन डिसेंबरपर्यंतच!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

मुंबई : दूरसंपर्क सेवा क्षेत्रात गळेकापू स्पर्धा ठरणारी "जिओ वेलकम ऑफर' दूरसंचार नियामकाच्या (ट्राय) आदेशामुळे रिलायन्स जिओला 3 डिसेंबरलाच आटोपती घ्यावी लागणार आहे. याआधी 31 डिसेंबरपर्यंत "वेलकम ऑफर' सुरू राहणार होती, मात्र 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी मोफत सेवेची योजना राबवता येत नसल्याने कंपनीला "वेलकम ऑफर" 3 डिसेंबरपर्यंतच सुरू ठेवता येईल. दरम्यान वेलकम ऑफर बंद होणार असली तरी 3 डिसेंबरपर्यंतच्या जिओ सिमकार्डधारकांना 31 डिसेंबरपर्यंत व्हॉइस आणि डाटा मोफत मिळेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

जिओने 5 सप्टेंबरला "वेलकम ऑफर' जाहीर केली. ग्राहकांना जिओ सिमकार्ड घेऊन 31 डिसेंबरपर्यंत या योजनेत सहभागी होण्याची संधी होती. मात्र इतक्‍या प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या "वेलकम ऑफर'वर इतर कंपन्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी दूरसंचार नियामकाकडे या विरोधात धाव घेतली. मोफत कॉलिंग आणि डाटाबाबत दूरसंचार विभागाने जिओला क्‍लीनचीट दिली असली "वेलकम ऑफर' 31 डिसेंबरपर्यंत राबवता येणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी 90 दिवसांसाठी म्हणजेच 3 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना "वेलकम ऑफर'नुसार मोफत कॉलिंग आणि डाटा योजनेत सहभागी होता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. त्यानंतर जिओ नेटवर्कमध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना नव्या योजनेनुसार कॉल दर लागू केले जातील.

खरी स्पर्धा कमर्शिअल टॅरीफनंतरच
कॉलिंग आणि डाटा पूर्णपणे मोफत असल्याने "जिओ'समोर इतर स्पर्धक कंपन्यांची दमछाक झाली आहे. दीड महिन्यात मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी करून ग्राहक जिओकडे आकर्षित होत आहे. मात्र जिओचे कमर्शिअल टॅरिफ प्लान लागू झाल्यानंतर दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये खरी स्पर्धा निर्माण होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

अर्थविश्व

मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेनेही बचत खात्यावरील...

11.39 AM

मनुष्यबळ विकास मंत्रालय - आगामी काळात केवळ कामगिरीचा विचार होणार  नवी दिल्ली - कामगिरीच्या आधारे होणाऱ्या नियुक्‍...

11.39 AM

मुंबई - ‘इन्फोसिस’ची १३ हजार कोटींचे शेअर ‘बायबॅक’ करण्याची शक्‍यता आहे. येत्या १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या...

11.39 AM