फियाट ख्रायसलरने बोलाविल्या 2 लाख 97 हजार मिनीव्हॅन परत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

न्यूयॉर्क : फियाट ख्रायसलर ऑटोमोबाईल्सने उत्तर अमेरिकेत विक्री केलेल्या दोन लाख 97 हजार मिनीव्हॅन वायरींगची समस्या असल्याने परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. वायरींग समस्येमुळे मिनीव्हॅनमधील एअरबॅग अचानकपणे उघडत असल्याचे निदर्शनास आले होते.

कंपनीने डॉज ग्रॅंड कॅरव्हान या 2011-12 मध्ये उत्पादित मिनीव्हॅन परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. या मिनीव्हॅनमधील एअरबॅग अचानकपणे उघडून आतापर्यंत 13 जण जखमी झाले आहेत. चालकाच्या बाजूची एअरबॅग कोणत्याही सूचनेविना उघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. वायरींगच्या समस्येमुळे हे घडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जुलैमध्ये कंपनी मिनीव्हॅन परत बोलाविण्यास सुरवात करणार आहे. अमेरिकेतील दोन लाख 9 हजार आणि कॅनडातील 88 हजार मिनीव्हॅन परत बोलाविण्यात येणार आहेत. या मिनीव्हॅनमधील वायरींग बदलून सुरक्षात्मक उपाययोजना कंपनीचे वितरक त्यामध्ये बसविणार आहेत.