रुपया 17 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

रुपया आजच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत 28 पैशांनी वधारून 65.13 रुपये प्रतिडॉलरवर पोचला आहे.

अर्थविषयक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -  सकाळमनी 

नवी दिल्ली : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया आज (सोमवार) 17 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. बँका आणि निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्याने रुपयाला बळ मिळाले आहे. रुपया आजच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत 28 पैशांनी वधारून 65.13 रुपये प्रतिडॉलरवर पोचला आहे.

भारतीय शेअर बाजारात देखील तेजीचे वातावरण असल्याने रुपयाला आधार मिळाला आहे. चालू वर्षात रुपया डॉलरच्या तुलनेत 4.05 टक्क्यांनी वधारला आहे.

सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकात 208 अंशांची घसरण झाली असून 29,213.39 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 70 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी सध्या 9,038.2 पातळीवर आहे.