एसबीआयकडून सहा लाख डेबिट कार्ड ब्लॉक

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

एटीएमएमध्ये व्हायरस शिरल्याने संवेदनशील माहिती उघड होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही पुर्वसूचना न देता बँकेने हा निर्णय घेतला. परंतु एसबीआयशी संबंधित एटीएम नेटवर्क सुरक्षित असल्याचेही बँकेने नमूद केले आहे.

मुंबई: भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) सुरक्षेच्या कारणास्तव सहा लाख डेबिट कार्ड्स ब्लॉक केले आहेत, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

एटीएमएमध्ये व्हायरस शिरल्याने संवेदनशील माहिती उघड होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही पुर्वसूचना न देता बँकेने हा निर्णय घेतला. परंतु एसबीआयशी संबंधित एटीएम नेटवर्क सुरक्षित असल्याचेही बँकेने नमूद केले आहे.

कार्ड ब्लॉक झालेल्या ग्राहकांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी फोन बँकिग किंवा जवळच्या शाखेत त्वरीत संपर्क साधल्यानंतर त्यांना नवीन कार्ड दिले जाईल, असे एसबीआयने सांगितले आहे. भारतीय बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कार्ड रिप्लेसमेंट मानली जात आहे. परंतु नवे कार्ड मिळण्यासाठी त्यांना काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल. ऐन दिवाळीपुर्वी असे झाल्याने अनेक ग्राहकांना नुकसान होण्याची शक्यता आहे.

आरबीआयच्या आकेडवारीनुसार जुलै 2016 मध्ये एसबीआय आणि सहयोगी बँकांची 20.27 कोटी डेबिट कार्ड वापरात आहेत. त्यातील 0.25 टक्के कार्ड ब्लॉक करण्यात आली आहेत.