‘एसबीआय’कडून मल्ल्यांचे कर्ज बुडीत खात्यात

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

एसबीआयने जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत सुमारे सात हजार कोटींची कर्जे 'राईट ऑफ' केली आहेत. परिणामी एसबीआयच्या नफ्यात सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 99.6 टक्के घसरण होऊन तो फक्त 20.7 कोटी रुपयांवर आला आहे. तिमाहीत बॅंकेने थकीत कर्जांच्या तरतुदीत तिप्पट वाढ केली आहे.

नवी दिल्ली - देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) उद्योगपती विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्जाचा बुडीत कर्जात समावेश केला आहे. एसबीआयने मल्ल्यांच्या 1201 कोटी रुपयांचे कर्ज बुडीत केले आहे.

किंगफिशर एअरलाईन्सबरोबरच केएस ऑईल, सुर्या फार्मास्युटिकल, गेट इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन आणि साई इन्फो सिस्टिम अशा काही कंपन्यांचे कर्जदेखील बुडीत खात्यात जमा करण्यात आले आहे. बँकिंगच्या क्षेत्रात अशा प्रक्रियेला 'राईट ऑफ' असे म्हणतात.

एसबीआयने जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत सुमारे सात हजार कोटींची कर्जे 'राईट ऑफ' केली आहेत. परिणामी एसबीआयच्या नफ्यात सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 99.6 टक्के घसरण होऊन तो फक्त 20.7 कोटी रुपयांवर आला आहे. तिमाहीत बॅंकेने थकीत कर्जांच्या तरतुदीत तिप्पट वाढ केली आहे.

"एसबीआय'ला मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत 4 हजार 991 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बॅंकेचे एकूण उत्पन्न 72 हजार 918 कोटी रुपयांवर गेले आहे. मागील वर्षी याच काळात ते 66 हजार 828 कोटी रुपये होते. बॅंकेच्या निव्वळ नफ्यात 35 टक्के घसरण होऊन तो 2 हजार 538 कोटी रुपयांवर आला आहे. बॅंकेची प्राप्ती 50 हजार 742 कोटी रुपयांवर गेली असून, मागील वर्षी याच काळात ती 46 हजार 854 कोटी रुपये होती.

बॅंकेची एकूण अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) म्हणजेच एकूण थकीत कर्जांचे प्रमाण 7.14 टक्‍क्‍यांवर गेले आहे. निव्वळ एनपीए 4.19 टक्‍क्‍यांवर गेला आहे. बॅंकेचा एकूण एनपीए 1 लाख 5 हजार 782 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात तो 56 हजार 834 कोटी रुपये होता. यात सुमारे शंभर टक्के वाढ झाली आहे.

अर्थविश्व

शेल कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा नवी दिल्ली - बाजार नियंत्रक मंडळ सेबीने आता शेल (बनावट...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

आठवडाभरातील स्‍थिती; सेन्सेक्‍सने १,०११, तर निफ्टीने ३५५ अंश गमावले मुंबई - आठवडाभर शेअर बाजारात झालेल्या पडझडीत बडे शेअर्स...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जोडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ  नवी दिल्ली - देशभरात ९.३ कोटी पॅन कार्डची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे, अशी...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017