बाजाराला “जीडीपी’ आकडेवारीचे बळ; सेन्सेक्समध्ये 200 अंशांची वाढ

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई: नोटाबंदीच्या निर्णयाचा काल सादर झालेल्या राष्ट्रीय देशांतर्गत उत्पादनाच्या(जीडीपी) आकडेवारीवर कोणताही परिणाम न झाल्याने आज(बुधवार) शेअर बाजाराला बळ मिळाले आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 200 अंशांनी वधारला असून निफ्टीचा 8950 अंशांच्या दिशेने प्रवास सुरु आहे. आशियाई बाजारातील तेजीमुळेदेखील देशांतर्गत शेअर बाजारातील निर्देशांकामध्ये वाढ झाली आहे.

सध्या(9 वाजून 35 मिनिटे) सेन्सेक्स 245.52 अंशांच्या वाढीसह 28,988.84 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8,946.30 पातळीवर व्यवहार करत असून 66.70 अंशांनी वधारला आहे.

बाजारात ऑईल अँड गॅस क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये तेजीचे वातावरण आहे. बँकिंग, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रात एक टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे.

निफ्टीवर अॅक्सिस बँक, सन फार्मा, बँक ऑफ बडोदा, हिरो मोटोकॉर्प आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर आयडिया, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट्स आणि भारती एअरटेलचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: sensex 200 points up now