तेजीला नफेखोरीचा ‘ब्रेक’

पीटीआय
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - शेअर बाजारात मागील नऊ सत्रांत सुरू असलेली तेजी बुधवारी दहाव्या सत्रात नफेखोरीमुळे थांबली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ६३ अंशांची घसरण होऊन ३४ हजार ३३१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २२ अंशांची घट होऊन १० हजार ५२६ अंशांवर बंद झाला. 

जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण असतानाही परकी गुंतवणूकदार देशांतर्गत शेअर बाजारातून निधी काढून घेत आहेत. याचवेळी देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर वाढला आहे. यामुळे सेन्सेक्‍समध्ये सकाळपासून वाढ झाली. मात्र, निर्देशांक बंद होण्याआधी नफेखोरी सुरू झाल्याने घसरण सुरू झाली. अखेर तो कालच्या तुलनेत ६३ अंशांची घसरण होऊन ३४ हजार ३३१ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये मागील नऊ सत्रांत १ हजार ३७५ अंश वाढ झाली होती. याच काळात निफ्टीमध्ये ४२० अंश वाढ झाली.

निर्देशांकांतील घसरण 
सेन्सेक्‍स :  63 अंश
निफ्टी :  22 अंश

Web Title: Sensex down