बाजारात चढ-उतारांसह व्यवहार; टीसीएसमध्ये घसरण

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई: भारतीय शेअर बाजारात आज(बुधवार) चढ उतारांसह व्यवहार सुरु आहे. सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण झाली असून निफ्टी 9100 अंशांच्या खाली गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि आयटी कंपन्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. सध्या(10 वाजून 21 मिनिटे) सेन्सेक्स 29,333.42 पातळीवर व्यवहार करत असून 14.32 अंशांनी वधारला आहे. दरम्यान, निफ्टी 9,103.30 पातळीवर व्यवहार करत असून 1.85 अंशांनी घसरला आहे.

बाजारात बँकिंग व ऑईल अँड गॅस क्षेत्रात किरकोळ घसरण झाली आहे. मात्र, इतर सर्व क्षेत्रांमध्ये तेजीचे वातावरण आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या(टीसीएस) शेअरमध्ये घसरण झाली आहे. कंपनीने काल बाजार बंद झाल्यावर निकाल जाहीर केले होते.

निफ्टीवर टाटा पॉवर, पॉवरग्रिड कॉर्पोरेशन, सन फार्मा, एनटीपीसी आणि भारती इन्फ्राटेलचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर अॅक्सिस बँक, बीपीसीएल, बँक ऑफ बडोदा, ओएनजीसी आणि बजाज ऑटोचे शेअर्स सर्वाधिक कोसळले होते.