सेन्सेक्सचा तेजीसह व्यवहार; निफ्टी 8800 अंशांच्या पार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

मुंबई: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय शेअर बाजाराची आज(सोमवार) पुन्हा एकदा तेजीसह सुरुवात झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे 100 अंशांनी वधारला असून निफ्टीची 8800 अंशांच्या पार सुरुवात झाली आहे. सध्या(9 वाजून 40 मिनिटे) सेन्सेक्स 40.25 अंशांच्या वाढीसह 28,374.50 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8,803.85 पातळीवर व्यवहार करत असून 10.30 अंशांनी वधारला आहे.

अमेरिकेतील नव्या अध्यक्षांनी हाती घेतलेल्या कर सुधारणा, सकारात्मक आर्थिक आकडेवारी आणि 'वन चायना' धोरणाला मिळालेली मान्यता या कारणांमुळे आशियाई बाजारात आज सकारात्मक वातावरण आहे. मेटल, बँकिंग आणि वीज कंपन्यांच्या शेअर्स देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, कॅपिटल गूड्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स, आयटी, ऑईल अँड गॅस क्षेत्रात नकारात्मक व्यवहार सुरु आहेत.

निफ्टीवर हिंडाल्को, कोटक महिंद्रा बँक, भारती इन्फ्राटेल, टाटा स्टील आणि गेलचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत. निराशाजनक तिमाही निकालांमुळे आयडिया सेल्युलर आणि बडोदा बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. याशिवाय, कोल इंडिया, भेल आणि अरबिंदो फार्माचे शेअर्सदेखील कोसळले आहेत.

अर्थविश्व

शेल कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा नवी दिल्ली - बाजार नियंत्रक मंडळ सेबीने आता शेल (बनावट...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

आठवडाभरातील स्‍थिती; सेन्सेक्‍सने १,०११, तर निफ्टीने ३५५ अंश गमावले मुंबई - आठवडाभर शेअर बाजारात झालेल्या पडझडीत बडे शेअर्स...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जोडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ  नवी दिल्ली - देशभरात ९.३ कोटी पॅन कार्डची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे, अशी...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017