महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजार बंद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मुंबई: हिंदू सण 'महाशिवरात्री'निमित्त आज(शुक्रवार) भारतातील शेअर बाजार, परदेशी विनिमय बाजार (फॉरेक्स) आणि कमोडिटी बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत. आता थेट सोमवारी(ता. 27) रोजी बाजारांमधील व्यवहार सुरु होतील.

काल(गुरुवार) शेअर बाजार सलग सहाव्या दिवशी सकारात्मक पातळीवर बंद होण्यास यशस्वी झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 28 अंशांनी वधारून 28,892.97 पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 13 अंशांनी वधारून बंद झाला. निफ्टी अखेर 8,939.50 पातळीवर स्थिरावला.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या युआनविषयीच्या वक्तव्यामुळे आशियाई बाजारातील निर्देशांकानी काहीशी विश्रांती घेतली आहे. चीनचे चलन युआन हे चलन व्यवहारांमध्ये हालचाल घडवून आणण्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. गेल्या महिनाभरात ट्रम्प यांच्या 'प्रोटेक्शनिझ्म'च्या धोरणांमुळे जगभरातील बाजारांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. परंतु ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनातील अस्थिर भावना नाहीशी होण्यास आणखी वेळ लागू शकतो.

Web Title: share bazar holiday