गुंतवणुकीची संधी: सुवर्णरोख्यांची विक्री आजपासून सुरू

Gold
Gold

नवी दिल्ली: सार्वभौम सुवर्णरोख्यांची आजपासून (सोमवार) सुरू झाली आहे.  यासाठी सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 2901 रुपये निश्चित करण्यात आला आहे. ही माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. चालू आर्थिक वर्षातील सार्वभौम सुवर्णरोखे योजनेचा हा पहिला टप्पा असून 28 एप्रिलपर्यंत सुवर्णरोख्यांसाठी अर्ज करता येणार आहे. केंद्र सरकारने अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर सार्वभौम सुवर्ण सुवर्णरोख्यांची विक्री सुरू केली आहे.

सुवर्णरोख्यांची विक्री करताना सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्याचा सरासरी भाव काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिग्रॅमसाठी 2951 रुपये भाव ठरवण्यात आला आहे. मात्र सरकारने त्यावर 50 रुपयांची सवलत दिली असल्याने  प्रतिग्रॅम 2901 रुपयांना  सुवर्ण रोखे मिळणार आहेत.

सरकारने नागरिकांना प्रत्यक्ष सोने विकत घेण्याऐवजी सुवर्ण रोख्यांत गुंतवणूक करण्यासाठी ही योजना नोव्हेंबर 2015 पासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदी न करता त्यात गुंतवणुकीची संधी नागरिकांना मिळाली आहे. हे सुवर्ण रोखे आठ वर्षे मुदतीचे आहेत. प्राप्तिकर कायद्यानुसार विक्री केलेल्या सुवर्ण रोख्यांचा भांडवली नफा मुदतपूर्तीपश्‍चात करमुक्त करण्यात आला आहे. शिवाय या रोख्यांवर दरवर्षी अडीच टक्के दराने सहामाही (करपात्र) व्याज देण्याची तजवीज आहे. तसेच वीस हजार रुपयांपर्यंतची खरेदी रोख पैसे देऊनही करता येणार आहे. तात्पुरत्या आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी हे सुवर्ण रोखे घेतलेल्या कर्जासाठी तारण म्हणून ठेवता येऊ शकतील.

येथून करा सुवर्णरोख्यांची खरेदी: 

कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेत, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, शेअर बाजार आणि काही निवडक टपाल कार्यालयांत या सुवर्ण रोखे खरेदीचे अर्ज मिळू शकतील.

सुवर्णरोख्यांवर किती व्याज मिळणार?

या सुवर्ण रोख्यांवर वार्षिक 2.75 टक्के दराने व्याज दिले जाईल. हे व्याज दर सहा महिन्यांनी जमा करण्यात येते.

किती गुंतवणूक करता येते?

सुवर्णरोख्यांमध्ये किमान गुंतवणूक एक ग्रॅम पासून कमाल गुंतवणूक 500 ग्रॅमपर्यंत करता येते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com