अनुदानित गॅस सिलिंडर महागला
आता एका 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 442.77 रुपयांवर पोचली आहे. गेल्या महिन्यात 1 एप्रिलरोजी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 5 रुपये 57 पैशांनी वाढवण्यात आली होती. मात्र विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 92 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
आणखी अर्थविषयक ताज्या घडामोडी येथे वाचा - www.sakalmoney.com
मुंबई : केंद्र सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 2 रुपयांची वाढ केली आहे, तर केरोसिनचा दर प्रतिलिटर 26 पैशांनी वाढविण्यात आला आहे. काल मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. केंद्र सरकार लवकरच पेट्रोलियम पदार्थांवर देण्यात येणारे अनुदान हटविण्याचा विचार करीत आहे.
सरकारी मालकीच्या तेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडर एलपीजीची किंमत 1.87 रुपयाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता एका 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 442.77 रुपयांवर पोचली आहे. गेल्या महिन्यात 1 एप्रिलरोजी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 5 रुपये 57 पैशांनी वाढवण्यात आली होती. मात्र विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 92 रुपयांची कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात त्यात 14.50 रुपयांची कपात करण्यात आली होती.
अनुदानीत केरोसीनची किंमत 0.26 पैशांनी वाढविण्यात आली होती. मुंबईत आता प्रति लिटर केरोसीनचा दर 19.55 रूपये करण्यात आला आहे. केंद्र सरकारने दर महिन्याला केरोसिनवरील अनुदान कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दर महिन्याला प्रति लिटर 0.25 पैसे अनुदान कमी करण्यात येणार आहे.