यंदा ‘जॅग्वार लँड रोव्हर’ची सर्वोत्कृष्ट वार्षिक कामगिरी

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

नवी दिल्ली: टाटा मोटर्सची कंपनी जॅग्वार लँड रोव्हरने(जेएलआर) सरलेल्या आर्थिक वर्षात एकुण 6 लाख 04 हजार 9 वाहनांची विक्री केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात 16 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. कंपनीने पहिल्यांदाच सहा लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. या काळात, किरकोळ विक्रीचे प्रमाण 13 टक्क्यांनी वाढले. कंपनीने यादरम्यान 1 लाख 79 हजार 509 वाहनांची किरकोळ विक्री केली. त्यापैकी मार्च महिन्यात 90 हजार 838 वाहनांची विक्री झाली.

लँडरोव्हर वाहनांच्या विक्रीत अवघ्या एक टक्क्याची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 4 लाख 31 हजार 161 लँडरोव्हर वाहनांची विक्री झाली आहे. डिस्कव्हरी स्पोर्ट्स, इव्होक आणि रेंज रोव्हर स्पोर्टला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली.

Web Title: Tata Motors' Jaguar Land Rover retail sales cross 6 lakh units for first time