कर संकलन असमाधानकारक

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जुलै 2017

'सीबीडीटी'कडून प्राप्तिकर विभाग धारेवर; वाढीसाठी प्रयत्न करण्याची सूचना

नवी दिल्ली: कर संकलनात वाढ न झाल्याने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत कर संकलन समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे.

'सीबीडीटी'कडून प्राप्तिकर विभाग धारेवर; वाढीसाठी प्रयत्न करण्याची सूचना

नवी दिल्ली: कर संकलनात वाढ न झाल्याने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत कर संकलन समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे.

याविषयी "सीबीडीटी'चे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी प्राप्तिकर विभागाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांना सूचना केल्या आहेत. यात त्यांनी म्हटले आहे, की कर संकलन वाढविण्यासाठी सर्व त्या उपाययोजना हाती घ्याव्यात. सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत संकलनामध्ये अपेक्षित वाढ दिसावी, यासाठी प्रयत्न करावेत. याबाबत चंद्रा यांनी प्राप्तिकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्तांनाही पत्र लिहून कर संकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वर्षभर सातत्याने प्रयत्न करण्याची गरज मांडली आहे. जूनपर्यंत झालेल्या कर संकलनातील वाढ अनेक निकषांवर समाधानकारक नसल्याबद्दल चंद्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देशात अतिशय कमी कर संकलन झालेल्या विभागांचा "सीबीडीटी'ने आढावा घेतला आहे. त्यामुळे अशा विभागांमध्ये संकलनासाठी पर्यायी स्रोतांचा वापर करावा, असे चंद्रा यांनी म्हटले आहे. देशात प्रत्यक्ष करांचे संकलन 1.42 लाख कोटी रुपयांवर गेल्याचे काल (ता. 6) "सीबीडीटी'ने जाहीर केले होते. चालू अर्थिक वर्षातील उद्दिष्टाच्या 14.5 टक्के हे संकलन आहे.

कर संकलनातील एकूण वाढ 8.4 टक्के असून, परताव्याचे प्रमाण कमी असल्याने ही वाढ दिसत आहे. निव्वळ वाढ ही 15 टक्के असून, परताव्याचे प्रमाण वाढल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात घसरण होणार आहे. 
- सुशील चंद्रा, अध्यक्ष, सीबीडीटी