मल्ल्यांच्या 'किंगफिशर व्हिला'ची अखेर विक्री

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

गोव्यातील कॅंडोलिम भागात वसलेल्या या बंगल्याच्या विक्रीसाठी बँकांना तीन वेळा अपयश आले आहे. मागील वेळी आयोजित लिलावात विक्रीसाठी 73 कोटी रुपयेएवढी राखीव किंमत निश्‍चित करण्यात आली होती. जोशी याने यापेक्षा किंचित अधिक रकमेला ही खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली - नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून भारताबाहेर निघून गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या मालमत्तेचा लिलाव करून रक्कम वसूल करण्याच्या प्रयत्नास बँका आणि सरकारला अखेर यश मिळण्यास सुरुवात झाली आहे. गोव्यातील मल्ल्या यांच्या मालकीच्या 'किंगफिशर व्हिला' या बंगल्याची विक्री करण्यात बँकेला यश मिळाले आहे.

स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, हा बंगला कोणी खरेदी केला आणि किती रुपयांचा व्यवहार झाला, याबाबत माहिती उघड करू शकत नसल्याचे सांगितले आहे. अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशी याने "किंगफिशर व्हिला' खरेदी केल्याचे वृत्त "टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. जोशीच्या विकिंग मिडिया अँड एंटरटेमेंटने 73 कोटींपेक्षा अधिक रक्कम देऊन हा बंगला खरेदी केल्याचेही वृत्तात  म्हटले आहे.