शेअर बाजारकडून ‘जीएसटी’चे स्वागत

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई: शेअर बाजाराने 'जीएसटी'चे स्वागत केले आहे. 'जीएसटी' लागू झाल्यानंतर आज शेअर बाजाराचा पहिलाच दिवस आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आज सकाळच्या सत्रात 1 टक्क्यांनी वधारले आहेत. सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 241 अंशांनी वधारअ असून तो 31,162.27 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 71 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी सध्या 9,592.10 अंशांवर व्यवहार करतो आहे.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीचा उत्साह आहे. फार्मा क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रातील शेअर्स वधारले आहेत. एफएमसीजी, मेटल, रिअल्टी, कॅपिटल गुड्स, कंज्यूमर ड्युरेबल्स आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात आयटीसी, भारती इन्फ्राटेल, हिंदाल्को, आयशर मोटर्स, वेदांत, कोल इंडिया, इन्फोसिस, मारुती सुझुकी, महिंद्र अॅण्ड महिंद्र यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर एचसीएल टेक, एनटीपीसी, बजाज ऑटो बड्या, कोटक महिंद्रा बँक, डॉ रेड्डी, विप्रो आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.