जागतिक बॅंकेकडून महाराष्ट्राला मिळणार एक अब्ज डॉलरचे अर्थसाह्य

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई: जागतिक बॅंकेने महाराष्ट्र राज्याला एक अब्ज डॉलरचे कर्जाच्या स्वरुपातील अर्थसाह्य देणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील शहरी वाहतूक आणि कृषी क्षेत्रासंबंधी सेवांच्या विकासासाठी अर्थसाह्य देण्यात येणार आहे.

मुंबई: जागतिक बॅंकेने महाराष्ट्र राज्याला एक अब्ज डॉलरचे कर्जाच्या स्वरुपातील अर्थसाह्य देणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील शहरी वाहतूक आणि कृषी क्षेत्रासंबंधी सेवांच्या विकासासाठी अर्थसाह्य देण्यात येणार आहे.

जागतिक बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) क्रिस्तलिना जॉर्जिया सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील शहरी वाहतूक, ग्रामीण पाणीपुरवठा व कृषी यांच्या विकासासाठी जागतिक बॅंकेने महाराष्ट्रात 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. "महाराष्ट्र शासन नागरिकांचे जीवनमान आणि आर्थिक स्तर उंचावण्यास वचनबद्ध आहे. सध्या राज्य प्रामुख्याने नागरी वाहतूक, हवामानातील बदल आणि पाणी नियोजन या आव्हानांचा सामना करत आहे" असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. "आम्ही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिबद्ध आहोत. याचबरोबर भविष्यात जागतिक बॅंकेसोबत कार्य करण्यास आम्ही उत्सुक आहेत," असेही ते पुढे म्हणाले.

यावेळी जॉर्जिया यांनी शहरी वाहतूक आणि कृषी क्षेत्रासंबंधातील सेवेच्या विकासासाठी एक अब्ज डॉलरचे अर्थसाह्य देणार असल्याचे जाहीर केले. हे अर्थसाह्य येत्या 2-3 वर्षांत हे अर्थसाह्य उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. जॉर्जिया यांनी आपल्या या भारत दौऱ्यादरम्यान मुंबईत चर्चगेट ते दादार असा लोकलने प्रवास केला. याशिवाय मुंबईतील काही परिसराला भेटही दिली.