ब्लॉग

सम्राट फडणीस
Rahul Gandhi
भारतीय राजकारणाची दोन प्रमुख ढोबळ वळणं आजपर्यंत झाल्याचं दिसतं. पहिलं वळण होतं, आणीबाणीनंतरचं. काँग्रेसला पर्यायी राजकारण उभं राहण्याचं. त्यानंतरचं वळण बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतरचं. राजकारणात धर्माचा थेट वापर करण्याचं. आता तिसरं वळण भारतीय राजकारण घेतंय, ज्याची फारशी चर्चा अजून कुठं प्रत्यक्ष होत नाहीय. हे तिसरं वळण आहे, मायनॉरिटिज् किंवा अल्पसंख्यांकांची राजकीय प्रभावशक्ती मर्यादित करण्याचं. तिन्ही वळणांमध्ये... आणखी वाचा
प्रविण खुंटे
pravin khunte writes about Fathers love
आईचं मातृत्व, वात्सल्य ममता, प्रेम या विषयी खूप साहित्य निर्माण झाले आहे. पण त्या साहित्यात आई-एवढीच मातृत्वाची सावली देणारा बाप मात्र दुर्लक्षित राहिला. बापाची भूमिका केवळ चरितार्थ, अर्थार्जन आणि गरज पडल्यास संरक्षण एवढ्या पुरतीच मर्यादीत ठेवली गेली. बापाला कुटुंब प्रमुख केले, पण प्रेमाच्या, मायेच्या भावनेपासून दुर लोटले. तसे पाहिले तर मुलाला जन्म देणारी आई वेदनेशी लढत असताना बापाच्या अस्वस्थ मनाला तेवढ्याच वेदना... आणखी वाचा
विवेक मेतकर
अकोला : बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप। काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप।। बैल घामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक। बैल माझ्या शिवारात, काढी हिरवे स्वस्तिक।। ज्येष्ठ वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ यांचा 'वृषभसूक्त' नावाचा कवितासंग्रह... विलक्षण अशा 'भूदेव' शब्दांत त्यांनी बैलाचे वर्णन केले. अशा बैलाच्या श्रमावरच आपली संस्कृती उभी आहे. या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी राखून ठेवलेला... आणखी वाचा
​डॉ. ग्लोरिया कोंडविलकर-खामकर
Gloria Khamkar
आज मी मेथीची भाजी केलीय. खरं तर तुम्ही म्हणाल, यात काय विशेष! पण हो, विशेष आहे. आपल्या मातीपासून लांब परदेशात राहताना या छोट्या छोट्या गोष्टींविषयी विशेष प्रेम वाटतं. आपण आपल्या मातीशी जोडलेले आहोत असं वाटतं. 2008 मध्ये मी भारतातून इंग्लंडमध्ये आले. देश नवीन, भाषा इंग्रजी असली तरी 'अँक्सेन्ट'मुळे नवीनच वाटायची. इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्या बॉर्डरजवळ असलेल्या संडरलँड या गावात मी उच्च शिक्षणासाठी आले. याला मी... आणखी वाचा
संतोष शाळीग्राम
j&k
निवडणुकीच्या बाजारात आश्वासनांच्या आरोळ्या हा यशाचा भक्कम आधार मानला गेला. त्याआधारे सत्तापदांची मुकुटं राजकीय पक्षांनी वर्षानुवर्षे परिधान केली. लोकांच्या भावनांवर गारूड करून सत्ता भोगण्याचा हा खेळ आता अस्ताच्या दिशेने चालला आहे. कारगिलसारख्या दुर्गम आणि फार साक्षरता नसलेल्या भागात त्याचा अनुभव आला.  लडाख हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी झाली. त्यात लोकांनी आश्वासनांचा बाजार मांडणाऱ्या... आणखी वाचा