आंबेगाव - शिवसुष्टी एक राजकारण

shivsrushti.jpg
shivsrushti.jpg

पुणे : आंबेगाव-कात्रज बायपास येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नेतृत्वाखाली "महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान" यांच्या प्रयत्नातून शिवसृष्टी साकारली जात आहे. या शिवसृष्टीला मेगा टुरिझमचा दर्जा मिळेल. एका वेळी पंधरा हजार पर्यटक भेट देऊ शकतील एवढी क्षमता असणार आहे, असे सांगितले जाते. नुकतीच पाच कोटी रुपयांची मदत जेएनपीटीने त्यासाठी दिली आहे. महाराष्ट्र राज्य सरकार व भारत सरकारची आणखी मदत या प्रकल्पासाठी मिळू शकणार आहे. 

कोट्यवधी रुपये खर्च करून एक चांगला प्रकल्प पुण्याच्या वैभवात भर टाकणारा असेल तर पुन्हा पुन्हा बी.डी.पी. सारख्या पर्यावरण संवेदनशील विषयावर, अगदी दुप्पट टी.डी.आर. देऊन, अटी व शर्थी बदलून पुणे महानगरपालिका हद्दीतच दुसरी शिवसृष्टी उभारण्याचा घाट का घातला जातोय?, हे अनाकलनीय आहे. दुसरी शिवसृष्टी मनपा सिंहगडावर करण्याचा विचार का करत नाही किंवा सिंहगडावर सर्वकालीन सिंहगडसृष्टी उभारावी. सिंहगड हीच जागा सर्व दृष्टीने योग्य आहे. तिथे कायदा, नियम जे काय बदलायला हवयं ते बदलावे. त्या निमित्ताने पुणेकरांना खडकवासला-सिंहगड-पानशेतच्या ऋणातून काही अशी तरी उतराई होता येईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com