आंबेगाव खुर्दला पाणी कधी मिळणार ?

water_shortage
water_shortage

पुणे- शहराजवळील नवीन समावेश झालेल्या गावामध्ये कात्रज जवळील आंबेगाव खुर्द या गावाचा इतर काही गावांबरोबर समावेश झाला. इतर गावातील पुढारी मंडळी आपल्या गावाला पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळावे, यासाठी खटाटोप करताना दिसत असून त्यांना यश पण मिळत आहे. मात्र दुसरीकडे आंबेगाव खु्र्दसाठी कोणतीच हालचाल दिसत नाही. गावातील अनेक नवीन घरांच्या योजनांमध्ये लोकांनी घरे घेतली, आता तर महापालिकेत समावेश झाल्याने घरांचे दर तर वाढलेच सोबत बुकींगपण वाढले आहे. मात्र पाण्याची फार मोठी अडचण आहे. पाण्याची सोय नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसाला २० लिटरच्या बाटलीसाठी चाळीस ते पन्नास रुपये द्यावे लागत असून महिनेचे १५०० रुपये केवळ विकतच्या पाण्यावर खर्च होतात. पुणे शहराला २४ तास पाणी द्या पण या गावाची तहान भागवा. शासनाने या विषयावर लक्ष द्यावे अशी नागरीक अपेक्षा करत अाहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com