नदीपात्रामध्ये जलपर्णीमुळे पक्ष्यांचा जीव धोक्यात

संजय पाटील
सोमवार, 28 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कोरेगावपार्क ते कल्याणीनगर पुलाच्या दोन्हीबाजूला नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी (इकॉर्निया क्रसिप्स) साचल्यामुळे नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. तिथे असणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी कसलीच जलपर्णी तिथे अस्तित्वात नव्हती परंतु गेल्या काही दिवसांपासून वरच्या भागात कुठेतरी जलपर्णी काढण्याचे काम चालू असून काढलेली वनस्पती नदीतून वाहत येवून येथे जागोजागी साचल्यामुळे संपूर्ण नदीपत्रामध्ये पसरलेली आहे. यामुळे येथील वातावरण दूषित बनलेले असून याच ठिकाणी असलेल्या पक्षी अभयारण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांचे जीवन सुध्दा धोक्यात आले आहे. संबंधित विभागाने जलपर्णी काढून नदी स्वच्छ करावी. 

Web Title: life of birds is in danger due to Due to eichhornia crassipes in the river basin,