पुण्यात पावसामुळे डांबर गेले वाहून..!

गणेश कांबळे
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी
 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : गोळीबार मैदान ते कोंढवा खुर्द रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांवरील खडी, डांबर वाहून गेले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहन चालवताना चाक अडकून अनेक अपघातही होत असतात. या रस्त्यांवर उड्डाण पुलांचे काम चालू असल्याने या ठिकाणी पुलांसाठी लागणारे साहित्य अस्वव्यस्त पडल्यानेही रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. मनपा प्रशासनाने हे खड्डे तातडीने बुजवावे.