मतिमंद मुलांच्या शाळेला मदत करुन शिवजयंती साजरी

sinhgad-college_shivjayanti
sinhgad-college_shivjayanti

पुणे- सिंहगड कॉलेज येथील संघर्ष युवक प्रतिष्ठान यांच्यातर्फे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या तरुणाईने शिवराय व त्यांचे विचार समजुन घ्यावे यासाठी बाल शिवव्याख्याता अक्षय जोगदंड पाटील याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच संपूर्ण परिसरात भव्य शोभायात्रा करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर हा घोषणांनी दणाणून गेला.

त्यानंतर प्रतिष्ठान तर्फे ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांच्या निवासी शाळेला फ्रीज भेट देण्यात आले. तसेच सर्व मुलांनी ह्या मुलांसोबत आपला वेळ घालवला व ह्यांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल हे समजुन घेतले. यापुढे सुद्धा असेच सामाजिक कार्य प्रतिष्ठान करत राहील असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष परीक्षित तळोकार यांनी केले यावेळीस प्रितेश शिरसाठ, शिवम माने, अनंत लहाडे, घनश्याम निकम, ऋषभ  ताठीया, गोविंद उंबरे सिद्धांत शिंगे, महेंद्र कोरमी, विश्वजित विधळे शिवप्रेमी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com