विनापरवाना बांधकाम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

चिखली : नेवाळे वस्तीतील साई प्रयाग हौसिंग सोसायटीमध्ये(लेन नं. २) विनापरवाना ३ मजली इमारतीचे बांधकाम चालू आहे. त्याचा सर्व राडारोडा आजूबाजूच्या परिसरात टाकण्यात आला आहे. ज्यामुळे तेथील लोकांना त्याचा त्रास होत आहे. फक्त भाडे मिळेल या उद्देशाने तिथे अशाप्रकारची घरे बांधली जात आहेत. या विनापरवाना बांधकामांमुळे पालिकेचा महसूल बुडत आहे. या अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करावी, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही. 
 

Web Title: Unauthorized construction