पुण्यातील सामन्यासाठी तिकीटविक्री उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पुणे : गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या 15 जानेवारीला खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या तिकीटविक्रीला गुरुवारपासून (ता. 15) प्रारंभ होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच सामना आहे.

क्रिकेटप्रेमींना www.bookmyshow.com या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकिटे खरेदी करता येतील. याशिवाय भांडारकर रस्त्यावरील पीवायसी हिंदू जिमखाना येथे तसेच गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरही या सामन्याची तिकिटे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध असतील.

एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील हा दुसराच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे. तीन वर्षांनंतर प्रकाशझोतातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पुण्यात होत आहे. यापूर्वी एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 13 ऑक्‍टोबर 2013 रोजी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला होता.
विशेष म्हणजे या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय संघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाचा सहभाग होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय लढतीत भारताने पाच विकेट राखून विजय मिळविला होता.

तिकिटाचे दर
वेस्ट स्टॅंड व ईस्ट स्टॅंड ः रुपये 800, साऊथ अप्पर रुपये 1100, साऊथ लोअर ः रुपये 2000, साऊथ वेस्ट, साऊथ ईस्ट स्टॅंड ः रुपये 1750, नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टॅंड ः रुपये 2000, साऊथ पॅव्हेलियन ए व बी ः रुपये 3500.
कॉर्पोरेट बॉक्‍सचे सहा लाख रुपये. प्रत्येक कॉर्पोरेट बॉक्‍समध्ये 12 व्यक्ती बसू शकतात.