भारत-इंग्लंड सामन्याची तीन कोटींची तिकीटविक्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई : लोढा समितीने खर्चावर निर्बंध लावलेले असतानाही मुंबई क्रिकेट संघटनेने भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीतून सुमारे तीन कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

वानखेडे स्टेडियमवरील या सामन्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. विराट कोहली फलंदाजी करणार असल्यामुळे तिसऱ्या दिवशी स्टेडियम 90 टक्के भरले होते, तर रविवारी हाउसफुल्ल होते.

यंदाही मुंबई क्रिकेट संघटनेने शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी काही तिकिटे मोफत ठेवली होती. तरीही या सामन्याची तीन कोटींची तिकीटविक्री झाली. रविवारी तर तिकिटांचा काळाबाजारही सुरू होता. आज अखेरच्या दिवशी सामना लवकर संपण्याची शक्‍यता होती, तरीही चांगली गर्दी होती. यंदा इंग्लिश प्रेक्षकांचीही संख्या जास्त असल्याचे दिसून आले. त्या सर्वांना सचिन तेंडुलकर स्टॅंडची तिकिटे देण्यात आली होती.