क्रिकेटपटू करुण नायर थोडक्यात बचावला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

श्री पार्थसारखी मंदिरात सुरु असलेल्या वल्ला सद्या या उत्सावानिमित्त करुण नायर याठिकाणी जात होता. त्याच्यासह बोटीतून आणखी 100 जण प्रवास करत होते.

कोची - केरळमधील पंपा नदीतून प्रवास करताना बोट बुडाल्याने भारतीय क्रिकेट करुण नायर थोडक्यात बचावला आहे. या बोटीतील दोघे जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री पार्थसारखी मंदिरात सुरु असलेल्या वल्ला सद्या या उत्सावानिमित्त करुण नायर याठिकाणी जात होता. त्याच्यासह बोटीतून आणखी 100 जण प्रवास करत होते. पण, त्यांची बोट अचानक उलटली. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. बोट बुडाल्यानंतर काही क्षणांतच बचावासाठी बोट त्याठिकाणी आली आणि प्रवाशांना वाचविण्यात आले.

या बोटीतील अद्याप दोन प्रवासी बेपत्ता आहेत. बाकी नागरिकांना वाचविण्यात यश आल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले. 24 वर्षीय नायर हा कर्नाटककडून स्थानिक क्रिकेट खेळतो. नुकतेच झिंबाब्वे दौऱ्यादरम्यान त्याने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले होते.

क्रिकेट

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याच्या वृत्ताचे खंडन करत माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादने आपण...

02.36 PM

मुंबई : गेल्या 'आयपीएल'मध्ये भन्नाट सूर गवसलेल्या कृणाल पांड्या आणि बसिल थम्पी यांनी भारतीय 'अ' संघामध्ये स्थान पटकाविले आहे...

02.30 PM

टाँटन - विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेत भारताने सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंडचा पाडाव केला होता. आता मिताली राजचा संघ वेस्ट...

10.03 AM