परिपूर्ण "फिनिशर' सापडणे कठीण : धोनी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

रांची - एकदिवसीय क्रिकेटमध्ये "फिनिशर' ही जबाबदारी जेवढी कठीण आहे, तेवढेच परिपूर्ण "फिनिशिर' सापडणे कठीण असल्याचे मत भारताचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले.

रांची - एकदिवसीय क्रिकेटमध्ये "फिनिशर' ही जबाबदारी जेवढी कठीण आहे, तेवढेच परिपूर्ण "फिनिशिर' सापडणे कठीण असल्याचे मत भारताचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले.

घरच्या मैदानावर धोनीला बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. तो म्हणाला, ""एकदिवसीय क्रिकेटमध्ये अलीकडे "फिनिशर'च्या भूमिकेला खूप महत्त्व येऊ लागले आहे. त्यामुळे 5, 6 काय किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणे तेवढे सोपे राहिलेले नाही. अशा क्रमांकावर फलंदाजीला येऊन संघाला विजयापर्यंत नेऊ शकणारा परिपूर्ण खेळाडू आपल्याला अलीकडच्या काळात गवसलेला नाही.'' न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ 261 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 128 अशा चांगल्या स्थितीतून गडबडला. डावाच्या शेवटी अक्षर पटेल (38) आणि अमित मिश्रा (14) यांनी आशा पल्लवित केल्या होत्या. पण, त्यांची भागीदारी भारताला विजयापर्यंत नेऊ शकली नाही.

धोनीने संघातील नवोदित खेळाडूंना "लक्ष्य' केले. तो म्हणाला, ""अशा संथ झालेल्या खेळपट्टीवर आव्हानाचा पाठलाग करणे नेहमीच कठीण असते. सध्या दोन्ही बाजूने स्वतंत्र चेंडू वापरले जात असल्यामुळे हे आव्हान अधिक कठीण झाले आहे. त्यात प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा मार अचूक टप्प्यावर असेल, तर हेच आव्हान आणखी कठीण होते. त्यामुळे नवोदित खेळाडूंनी परिस्थितीचे झटकन अवलोकन करणे गरजेचे आहे.'' जेव्हा एखादी भागीदारी होत असते, तेव्हा सगळे सुरळीत असते. पण, ही भागीदारी तुटली की तुमच्यावरील दडपण वाढते आणि चौथ्या सामन्यात नेमके हेच घडल्याचे धोनीने मान्य केले.

भारतीय संघाचा विजय हा केवळ विराट कोहलीवर अवलंबून आहे का, असे विचारल्यावर धोनी म्हणाला, ""नाही, मला नाही तसे वाटत. एखाद्या खेळाडूची आकडेवारी बघून असे निष्कर्ष काढले जाऊ नयेत. प्रत्येक सामन्यात आम्ही चांगला खेळ केला आहे.

धोनी म्हणतो...

  • - खेळपट्टी कमालीची संथ
  • - अशा खेळपट्टीवर काही षटके खेळून काढायला हवीत
  • - भारतालादेखील चांगल्या सुरवातीचा फायदा उठवता आला नाही
  • - रोहित शर्मा अपयशाचा धनी ठरत असला, तरी त्याच्यात मोठी खेळी करण्याची क्षमता
  • - संथ खेळपट्टीवर आवश्‍यक धावगती वाढली, की आव्हान कठीण होते

क्रिकेट

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर सहज विजय डम्बुला (श्रीलंका) - प्रथम गोलंदाजांनी फिरकी घेतल्यानंतर फलंदाजीत शिखर...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

बर्मिंगहॅम - इंग्लंडने पहिल्या वहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजवर तिसऱ्याच दिवशी १ डाव आणि २०९ धावांनी विजय मिळविला...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

आव्हान देण्याचीही श्रीलंका संघाची मानसिक तयारी नाही दाम्बुला - कसोटी मालिकेतील धवल यशानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित...

रविवार, 20 ऑगस्ट 2017