सलमानच्या 'त्या' वक्तव्याबाबत काय वाटते?

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

मुंबई - अभिनेता सलमान खान याने "सुल्तान‘ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रचंड परिश्रम घेत असल्याचे सांगताना चित्रीकरणानंतर "बलात्कारीत महिलेसारखे वाटत होते‘ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावरून सलमानवर प्रचंड टीका करण्यात येत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. "एका 120 किलो वजनाच्या मुलाला उचलून 10 वेळा वेगवेगळ्या अँगलने जमिनीवर फेकून देण्याचा प्रसंग फार कठीण होता. प्रत्यक्ष भांडणामध्येही असा प्रकार केला जात नाही. ज्यावेळी चित्रीकरण संपवून मी बाहेर येत होतो त्यावेळी मला बलात्करित महिलेसारखे वाटत होते. मी सरळ चालू शकत नव्हतो. त्यानंतर मी जेवण घेत होतो आणि पुन्हा प्रशिक्षणाला जात होतो‘, असे वक्तव्य सलमान खानने केल्याचे वृत्तात म्हटले आहे. या वक्तव्यामुळे सलमानवर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. दरम्यान नेटिझन्सनी "रेप्ड वुमन‘ या शब्दाचा चुकीचा अर्थ लावण्याचा येत असल्याचा दावा केला आहे. तर काहींनी सलमानला लक्ष्य केले आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर तुम्हाला काय वाटते? सेलिब्रिटीने समाजातील पीडित घटकाच्या वेदनेबद्दल अशा प्रकारे असंवेदनशील प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य आहे का? का हा प्रकार म्हणजे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचा एक भाग असेल? का सलमानने आपल्या चित्रीकरणादरम्यानच्या वेदना व्यक्त करण्यासाठी वापरलेला शब्द योग्यच होता? व्यक्त व्हा... बिनधास्त...