बुलेट ट्रेन रोखायला गुजरातचेच शेतकरी तयार

1000 farmers oppose bullet train project in Gujarat High Court
1000 farmers oppose bullet train project in Gujarat High Court

अहमदाबाद : प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला आता गुजरातमधील शेतकऱ्यांनीही विरोध केला आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाविरोधात जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी काल ता.(18) उच्च न्यायालयात धाव घेतली. यासंदर्भात, मुख्य न्यायाधीश आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती व्ही. एम. पांचोली यांच्या खंडपीठात जमीन अधिग्रहणास आव्हान देणाऱ्या 5 याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

तसेच, विरोध करणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल करुन केंद्राच्या या प्रकल्पाचा आम्ही विरोध करतो आम्ही असे म्हटलं आहे. या शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केला आहे. बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गावरील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा विरोध केला आहे. या प्रकल्पासाठी जमीन देण्याची आमची इच्छा नाही, असं या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

बुलेट ट्रेनसाठी सप्टेंबर 2015 मध्ये भारत आणि जपानदरम्यान करार झाल्यानंतर भूसंपादन कायदा 2013 कमकुवत करण्यात आला, असा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com