लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले

वृत्तसंस्था
रविवार, 21 मे 2017

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे आज दुपारी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत काही प्रवाशी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही.

उन्नाव - मुंबई-लखनौ दरम्यान धावणाऱ्या लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे 11 डबे आज (रविवार) दुपारी रुळावरून घसरले. या दुर्घटनेत जिवीतहानी झालेली नाही.

पोलिस अधीक्षक नेहा पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे आज दुपारी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत काही प्रवाशी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही. लोहांगपूर येथील रेल्वे अधिकाऱ्यांनी रुळाची पाहणी केल्यानंतर रेल्वे रुळ खराब असल्याचे आढळून आले. प्रवाशांना बसने आणि इतर रेल्वे गाड्यांनी लखनौला रवाना करण्यात आले.

रेल्वे रुळ खराब असल्याचे आढळून आल्याने दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाच्या चौकशीसाठी घटनास्थळी रवाना झाले आहे. लखनौ ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या या रेल्वेला कायम प्रवाशांची पसंती असते.