दाउदच्या चाहत्यास दिल्ली पोलीसांकडून अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

जतिन नावाच्या या युवकाने फेसबुकवर 'भाई जतिन बनिया' या नावाने अकाउंट बनवले होते. ज्यावरील माहितीवरून तो दाउदचा चाहता असल्याचे समजते. या फेसबुक अकाउंटवर दाउदची आणि बंदुकांची छायाचिञेही अपलोड केली आहेत.

नवी दिल्ली - अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या अंडरवल्ड डॅान दाऊद इब्राहिमचा 'चाहता' असलेल्या एका 19 वर्षे वयाच्या युवकास दिल्ली पोलीसांनी कापशेरा भागातुन अटक केली. या कारवाई दरम्यान 3 गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली.

जतिन नावाच्या या युवकाने फेसबुकवर 'भाई जतिन बनिया' या नावाने अकाउंट बनवले होते. ज्यावरील माहितीवरून तो दाउदचा चाहता असल्याचे समजते. या फेसबुक अकाउंटवर दाउदची आणि बंदुकांची छायाचिञेही अपलोड केली आहेत.

आठ महिन्यांपुर्वी जतिनचे काही मुलांशी भांडण झाल्यानंतर त्याने राहुल नावाच्या तरुणाकडुन गावठी पिस्तुल घेतले. राहुलकडुन 3 गावठी पिस्तुले व काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, असे पोलिस उपायुक्त सुरेंद्र कुमार यांनी सांगितले. 

इतरांना धाक दाखवण्यासाठी जतिन या बंदुकीचा वापर करताना आढळल्याने 'पोलीस मिञांनी' त्याची तक्रार केली होती व त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. चौकशीदरम्यान जतिनने राहुलच्या मदतीने अवैध शस्ञे मिळवल्याचे सांगितले.

देश

नवी दिल्ली : तोंडी तलाकला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहे. पाच पैकी तीन न्यायाधीशांनी तोंडी तलाख बेकायदा ठरविला....

11.30 AM

नवी दिल्ली : तोंडी तलाकविरोधात (ट्रिपल तलाक) संसदेत कायदा बनवावा, असे आदेश केंद्र सरकारला देतानाच तोंडी तलाकवर सहा महिने बंदी...

11.03 AM

शशिकला यांचे "अंदर-बाहर' नवी दिल्ली: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या अण्णा द्रमुकच्या प्रमुख व्ही. के. शशिकला...

07.24 AM