हैदराबादजवळ 2 संशयित गँगस्टर चकमकीत ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

हैदराबाद- येथून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या शादनगर परिसरात झालेल्या चकमकीत दोन संशयित गँगस्टर ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (सोमवार) दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱयांनी केलेल्या कारवाईत दोन गँगस्टर ठार झाले आहेत. यापैकी एकाची ओळख पटली असून, मोहम्मद नैमुद्दीन असे त्याचे नाव आहे. दुसऱाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

‘पोलिसांनी रविवारी (ता. 7) रात्रीपासून एका घराला वेढा घातला होता. या घरामध्ये गँगस्टर लपून बसल्याची माहिती मिळाली होती. आज सकाळी नैमुद्दीनने पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत नैमुद्दीनसह एक जण ठार झाला आहे,‘ अशी माहिती तेलंगणाचे पोलिस महासंचालक अनुराग शर्मा यांनी दिली.

दरम्यान, राज्यातील विविध पोलिस चौक्यांमध्ये नैमुद्दीनवर 100हून अधिक गुन्हे दाखल आहेत. सन 1993 मध्ये आयपीएस अधिकारी के. एस. व्यास यांची हत्या त्याने केली होती.

टॅग्स