स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनमध्ये 20 टक्के वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात 20 टक्के वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. 15) केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना त्यांनी सरकारच्या अनेक योजनांची माहिती दिली.

स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात 20 टक्के वाढ करण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज केली. सध्या 25 हजार पेन्शन मिळणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना यापुढे 30 हजार रुपये मिळतील. स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या, मात्र अज्ञातच राहिलेल्या आदिवासी लढवय्यांच्या गौरवार्थ अनेक राज्यांत वस्तुसंग्रहालये उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांचा एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार करील, अशी घोषणाही त्यांनी केली.
वीजबचत करणाऱ्या एलईडी बल्बची किंमत सरकारने हस्तक्षेप केल्यामुळे 350 वरून 50 रुपयांपर्यंत कमी झाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आज सांगितले. असे 77 कोटी एलईडी बल्ब बसवून एक लाख 25 हजार कोटी रुपयांची बचत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

कायद्यांच्या प्रचंड संख्येमुळे सरकार, न्यायपालिका आणि सामान्य नागरिकांचा गोंधळ उडतो. यातून मार्ग काढण्यासाठी अनावश्‍यक कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे मोदी यांनी सांगितले. कालबाह्य झालेले एक हजाराहून अधिक कायदे रद्द करण्यात आले असून असे आणखी एक हजार 741 कायदे मोडीत काढले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.